भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अत्यंत आध्यात्मिक आणि उदात्त अशा पूजाविधींपैकी एक असा म्हणजे पंचामृत अभिषेक होय. दूध, दही, मध, तूप आणि साखर या पाच पवित्र पदार्थांच्या मिश्रणाला पंचामृत असे संबोधले जाते. या अभिषेकात पंचामृताचा समावेश केला जातो.
"पंचामृत" हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे, जिथे:
म्हणून, पंचामृत याचा अर्थ "पाच पवित्र अमृतांचा मिश्रण" असा होतो. हिंदू धार्मिक विधींमध्ये, विशेषतः भगवान शिवाच्या अभिषेका दरम्यान पंचामृत शिवलिंगाला अर्पण केले जाते.
या प्रत्येक घटकाला (अमृत) एक विशिष्ट धार्मिक महत्व आहे. त्यात एकअद्भुत ऊर्जा असते; जी शुद्धता, पोषण आणि भक्ती यांचे प्रतीक असलेली एक दिव्य ऊर्जा निर्माण करते.
देवतांचे अमृत पंचामृत अभिषेक पूजेमध्ये अर्पण केले जाणारे पाच घटक हे आध्यात्मिकतेचे प्रतीक आहेत, जसे :-
घृष्णेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील प्राचीन वेरूळ लेण्यांच्या जवळ वसलेले घृष्णेश्वर मंदिर हे एक दैवी ऊर्जा असलेले मंदिर आहे.
पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने, या ठिकाणी एक अद्वितीय आध्यात्मिक चैतन्य आहे.
जिथे भगवान शिव आपल्या सर्वाधिक करुणामय आणि दिव्य स्वरूपात प्रकट होतात, असे मानले जाते.
जेव्हा आपण येथे महादेवाला पंचामृत अभिषेक पूजा करतो, तेव्हा आपण पाच पवित्र अमृतांचे मिश्रण अर्पण करण्याबरोबर स्वतःला अध्यात्मिक प्रगतीकडे झोकून देतो.
गृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे सर्व पूजा अधिकृत ताम्रपत्रधारी पंडितजींद्वारेच केल्या जातात— पिढ्यानपिढ्या पासून ह्या सर्व गुरुजींना इथे पूजा अभिषेक करण्याचे हक्क आहेत. तसेच वैध ओळखपत्रां बरोबरच त्यांना पूजा करण्याकरिता मंदिराद्वारे अधिकृतपणे मान्यता प्राप्त आहे. खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आणि प्रामाणिक पूजा अनुभवण्यासाठी, पूजा बुकिंग करून ब्रह्मवृंद संघाच्या अधिकृत पुरोहितांशीच संपर्क साधा.
चला पंचामृत अभिषेकाबाबत अधिक तपशीलात जाणून घेऊया:
अभिषेकादरम्यान पंचामृताचा शिवलिंगावरील प्रवाह हा दृष्य आणि अदृष्य अशा सर्व अशुद्धतांचा नाश करतो. प्रत्येक थेंबासोबत, आपण आपल्या भूतकाळातील चुकांचे/ पश्चातापाचे पापक्षालन आणि कर्मिक ऋणाचे समर्पण भगवान शिवाच्या चरणांवर करतो. गुरुजींद्वारे उच्चारिलेले शक्तिशाली मंत्र हे व्यक्तीचे शुद्धीकरण भाव आणखी द्विगुणित करतात, ज्यामुळे आपल्या आत्म्याला नवचैतन्य प्राप्त होते आणि मन संतुलित होते. "जसे वाहणारे पाणी दगडाला शुद्ध करते, तसचं पवित्र विधी आत्म्याला शुद्ध करतात."
पंचामृतातील प्रत्येक घटक—दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्वतःचे आध्यात्मिक आणि वैदिक गुण आहेत. हे सर्व एकत्र येऊन फक्त शिवलिंगाचे पोषणच करत नाहीत, तर भक्ताला आशिर्वादही प्राप्त करून देतात. या पूजेने खालील गोष्टींची प्राप्ती होते असे मानले जाते:
महादेवाच्या आराधनेत स्वतःला लिन करून घेतल्यास अध्यात्मिक प्रगती होते व मनःशांती लाभते. त्यामुळे आपणास जीवन सुखकर वाटते.
आपण करियरच्या आव्हानांचा, कौटुंबिक समस्या किंवा नातेसंबंधातील अडथळ्यांचा सामना करत असाल, तर पंचामृत अभिषेक एक आध्यात्मिक पुनर्स्थापनेचे कार्य करते. भक्तीचा हा मार्ग, तीव्र इच्छाशक्ती आणि पवित्र लहरींना एकत्रित करून, अडथळ्यांना दूर सारतो आणि नवीन सुरवात करण्यासाठी मदत करतो. या पवित्र ठिकाणी ज्योतिर्लिग स्थानी हि पूजा यथासांग संकल्पासहीत केल्यास शंकराचे थेट आशीर्वाद प्राप्त होतात व आपल्या मनोकामना पूर्णत्वास येण्यास, आश्चर्यचकित करणारे बदल घडण्यास आणि सकारात्मकतेची प्राप्ती होण्यास मदत होते.
भगवान शंकर हे अज्ञान आणि अहंकाराचे संहारक आहेत, तसेच वैश्विक सत्य आणि आंतरिक आनंदाचे दाता आहेत. पंचामृत अभिषेक ही फक्त एक अर्पण पूजा नसून तो एक आध्यात्मिक संवाद आहे. जेव्हा आपण श्रद्धेने शिवलिंगावर अमृत अर्पण करता, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या आतली दिव्य चेतना जागृत करत असता.
महाराष्ट्रातील वेरूळ (एलोरा) लेण्यांच्या जवळ वसलेल्या ग्रिशनेश्वर / घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या स्थानी ही पूजा केल्याने तिचे आध्यात्मिक प्रभुत्त्व वाढते. असे मानले जाते की शंकर स्वतः येथे त्यांच्या अत्यंत कृपाशील आणि दयाळू रूपात वास्तव्य करतात, ज्यामुळे पंचामृत अभिषेकाद्वारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा एक परिपूर्ण ठिकाण आहे.
पंचामृत रुद्राभिषेक पूजेसाठी खर्च ₹1,347/- ते ₹2,797/- दरम्यान असतो. खर्च निवडलेल्या पूजा मोड (ऑनलाइन पूजा किंवा ऑफलाइन पूजा) व दिवसावर अवलंबून असतो.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे पंचामृत अभिषेक करणे हा केवळ एक विधी नाही—तो एक पवित्र अनुभव आहे; जो उपासना , समृद्धी आणि ज्ञानाच्या दिशेने मार्ग दाखवतो. ह्या ठिकाणी श्रद्धा आणि परिवर्तन यांचा मेळ होतो, आणि जिथे आपली प्रार्थना थेट भगवान शिवाच्या हृदयापर्यंत पोहोचली जाते. फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर आपल्या अंतर्मनातील दिव्य जागृत करण्यासाठी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे अवश्य भेट द्या
© 2025 Grishneshwar Services. All rights reserved.Privacy Policy And Terms & Conditions Designed & Developed by Grishneshwar Services .