जलाभिषेक पूजा | भक्ती आणि पावित्र्याचे एक अर्पण

कधी तुम्हाला असे वाटले आहे का, की सर्व काही थांबवून डोळे मिटून एखाद्या महान, शांत, दिव्य आणि पवित्र शक्तीशी आपण जोडले जावे? चला तर मग हे अनुभवण्यासाठी जलाभिषेक पूजा करूया! ह्या अत्यंत सोप्या पण प्रभावी प्रक्रियेद्वारे तुम्ही शंकराशी गहन असा आध्यात्मिक दुवा प्रस्थापित करू शकता. इतर अनेक मंदिरांच्या तुलनेत, घृष्णेश्वर मंदिर भक्तांना स्वतः ज्योतिर्लिंगावर अभिषेक करण्याची संधी देते. होय, तुम्ही प्रत्यक्षरित्या दैवी शिवलिंगाला स्पर्श करू शकता, त्यावर पाणी अर्पण करू शकता आणि तुमच्या मनोकामना भक्तीभावाने महादेवापर्यंत पोहोचवू शकता. हा अनुभव एक विलक्षण आणि वैयक्तिक आध्यात्मिक अनुभूती देतो – जी शब्दांत वर्णन करणे कठीण आहे.

जलाभिषेक पूजा म्हणजे काय?

जलाभिषेक या शब्दाची फोड करून पाहूयात :-

  • "जल" म्हणजे पाणी.
  • "अभिषेक" म्हणजे देवाला अर्पण करणे किंवा स्नान घालणे.
  • "पूजा" म्हणजे उपासना — भगवंतावर प्रेम आणि भक्ती व्यक्त करण्याचा एक मार्ग.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील जलाभिषेक पूजा हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली आणि आध्यात्मिक उन्नती देणाऱ्या विधींमध्ये गणली जाते. भगवान शिव किंवा अन्य देवतांना पाणी (जल) अर्पण करून केली जाणारी ही मंगलमय कृती भक्ताच्या शुद्ध प्रेमाचे, गाढ श्रद्धेचे आणि परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पणाचे प्रतीक मानले जाते. हा केवळ एक विधी नसून, भाविक आणि महादेव यांच्यातील आत्मिक बांध आहे.

घृष्णेश्वर मंदिरातील जलाभिषेकाचे महत्त्व

पाणी हे जीवनाचे मूलतत्त्व आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते शुद्धता, शांती आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाचे प्रतीक मानले जाते. शिवलिंग किंवा देवतांना जल अर्पण करणे म्हणजे भक्ताच्या पूर्वसंचित पापांचे शुद्धीकरण, नकारात्मक ऊर्जांचे निवारण आणि जीवनात शांती, समृद्धी व सौदार्ह्य आमंत्रित करण्याचा मार्ग, असे मानले जाते.

प्राचीन शास्त्रांमध्ये भगवान शंकराचा उल्लेख "अभिषेक प्रिय" म्हणून केला आहे — जे पवित्र संतत-जलधारांनी अभिषेक करण्यात आनंद मानतात. जलाभिषेक केल्याने केवळ भगवान शिव प्रसन्न होतात असे नाही, तर त्यांच्या दिव्य आशीर्वादांद्वारे आरोग्य, यश आणि आध्यात्मिक प्रगतीची प्राप्ती होते असे मानले जाते.

घृष्णेश्वर मंदिरात जलाभिषेक पूजा करण्यासाठी अधिकृत गुरुजी

घृष्णेश्वर मंदिरातील सर्व अधिकृत गुरुजींची यादी खाली दिलेली आहे. पूजा बुक करण्यासाठी किंवा पूजे संदर्भात अभिक माहिती साठी तुम्ही खालील कोणत्याही गुरूजींशी संपर्क साधू शकता. या गुरूजींना ही पूजा करण्याचे स्थानिक अधिकार आहेत. (COMING SOON)

घृष्णेश्वर येथे जलाभिषेक पूजा कशी केली जाते?

पाणी, हे निसर्गातील पंचमहाभूतांपैकी एक असून, त्याला अत्यंत मोठे आध्यात्मिक महत्त्व प्राप्त आहे. या अभिषेकादरम्यान पाणी हे भक्तांची श्रद्धा, प्रार्थना आणि भक्ती वाहून नेणारे माध्यम बनते.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात जलाभिषेक पूजा कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते, परंतु पुढील दिवसांमध्ये याला विशेष महत्त्व आहे :

  • सोमवार (विशेषतः पवित्र अशा श्रावण महिन्यातील)
  • महाशिवरात्री
  • प्रदोष व्रत
  • प्रत्येक महिन्यातील शिवरात्री
  • भगवान शंकराला समर्पित असणारे मंदिर जसे की घृष्णेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, काशी विश्वनाथ, आणि भारतातील इतर अधिक नऊ ज्योतिर्लिंग, ही भक्तांसाठी या पवित्र पूजेचे अनुष्ठान करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत दिव्य स्थाने मानली गेली आहेत.

जलाभिषेक पूजा विधी प्रक्रिया

घृष्णेश्वर मंदिरातील जलाभिषेक पूजा प्रामुख्याने खालील चरणांमध्ये केली जाते:

  • संकल्प (व्रत) – भक्तिभावाने आणि शुद्ध अंतःकरणाने संकल्प घेणे.
  • शुद्धीकरण – शिवलिंग किंवा मूर्तीला पवित्र जलाने स्नान घालणे, सहसा यासाठी गंगा किंवा गोदावरीसारख्या नद्यांचे पाणी वापरले जाते.
  • मंत्रोच्चार – अभिषेक करताना "ॐ नमः शिवाय" आणि इतर शिव स्तोत्रांचे पठण करणे (गुरुजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे).
  • बिल्वपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण – उदबत्ती आणि दिव्याच्या तेजोमय प्रकाशात भक्तिपूर्वक पूजा करणे
  • आरती आणि प्रार्थना – पूजेचा समारोप हृदयस्पर्शी प्रार्थना आणि आध्यात्मिक स्तोत्रांसह करणे.

घृष्णेश्वर मंदिरात जलाभिषेक पूजा केल्याने मिळणारे लाभ

  • मानसिक शांती आणि भावनिक स्पष्टता मिळते.
  • जीवनातील अडथळे आणि कर्मबाधा दूर होण्यास मदत होते.
  • आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबातील सौदार्ह्यासाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात.
  • भक्त आणि परमात्मा यांच्यातील आध्यात्मिक नाते अधिक दृढ होते.

घृष्णेश्वर मंदिरातील जलाभिषेक पूजेची दक्षिणा

जलाभिषेक पूजेची दक्षिणा प्रत्येक पंडितजींनुसार वेगळी असते. वरील यादीतील अधिकृत पंडितजींशी संपर्क साधून तुम्ही पूजेच्या दक्षिणेबद्दलची माहिती घेऊ शकता आणि तुमच्या पूजेची बुकिंग सुनिश्चित करू शकता. तसेच, ते तुम्हाला दर्शनाची माहिती आणि पूजेच्या सामग्रीच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करतील.

एक दिव्य समर्पणचा प्रवास

जलाभिषेक पूजा केवळ जल अथवा पाणी अर्पण करण्याविषयी नाही – तर, ती परमात्म्याप्रती तुमचे अंतःकरण अर्पण करण्याविषयी केली जाणारी पूजाविधी आहे. या साध्या अर्पण क्रियेमध्ये भक्ती, कृतज्ञता आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे. ही पूजा भव्य मंदिरात केली गेली काय किंवा घराच्या शांत वातावरणात केली तरी , ती नेहमीच महादेवाची कृपादृष्टी भक्तांवर ठेवते. परंतु, महादेवाचे वास्तव्य मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्री अभिषेक करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे .

हे इतके विशेष का आहे?

आपल्या शास्त्रांमध्ये पाणी केवळ एक भौतिक घटक नसून, ते शुद्धता, शांती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा तुम्ही भगवान शिवांना जल अर्पण करता, तेव्हा तुम्ही जणू असे म्हणता: "हे महादेव, माझ्या हृदयातील सर्व भार दूर करा. माझे आत्मशुद्धीकरण करा. माझ्या जीवनात शांतीचा प्रवाह वाहू द्या." विशेषतः सोमवारी, श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला, संपूर्ण भारतभर भक्त अत्यंत भक्तिभावाने ही पूजा करतात. मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लागतात, भक्त गंगा किंवा गोदावरीसारख्या नद्यांचे पवित्र जल आणतात—किलोमीटरच्या अंतरावरून चालत येतात, केवळ ते जल शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी. ही परंपरा इतकी अगाध आहे की, ती भक्तांच्या श्रद्धेचे आणि समर्पणाचे प्रतीक बनली आहे.

Copyrights 2025, Privacy Policy All rights reserved.